*नगरसेविका अनारोजीन लोबो यांचा पत्रकार परिषदेत आरोप*
*💫सावंतवाडी दि.११-:* नगरपालिकेच्या कौन्सिल बैठकीत गाळे धारकांकडून शिवसेनेकडून २०१७ पासून थकित भाडे प्रती गाळे ६०० रुपये घेण्यात यावे आणि आतापासून नवीन भाडे भरून घेण्याच्या ठरावास संमती दिली असून, आमच्या वक्तव्याचा विपर्यास करून भाडे धारकांन पर्यंत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप अनारोजीन लोबो यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे.. तसेच प्रीमियम भरून घेण्यास शिवसेनेचा विरोध कायम असून सभागृहात याबाबत कोणताही ठराव घेण्यात आला नसून, त्यावर फक्त आणि फक्त चर्चा करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आपले नगरसेवक व्यापाऱ्यांकडून पैसे घेत नसून, आमचे नगरसेवक पैसे घेत असल्याचे नगराध्यक्षांनी दाखवावे आमचे सर्व नगरसेवक राजीनामा देतील असे सांगत आपल्या नगरसेवकांवर खोटे आरोप केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच व्यापाऱ्यांनी कोणालाही भिऊन जाण्याची गरज नसून शिवसेना त्यांच्या सोबत कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी महिला तालुकाध्यक्ष संघटक अपर्णा कोठावळे, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर,नगरसेवीका दिपाली सावंत, नगरसेवीका भारती मोरे, नगरसेविका माधुरी वाडकर, नगरसेवक बाबू कुडतरकर, जयेंद्र परुळेकर आदी उपस्थित होते.