💫वेंगुर्ला दि.२२-: भाजपातर्फे पक्षवाढीसाठी तसेच बुथप्रमुख व बुथसमीती सक्षम करण्यासाठी शक्ती केंद्र प्रमुख नेमलेले आहेत. या शक्तीकेंद्र प्रमुखांच्या माध्यमातून बुथसमीती गठीत करुन पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याकरीता सुरु करण्यात आलेल्या समर्थ बुथ अभियानाचा शुभारंभ आरवली-सागरतीर्थ येथे करण्यात आला.
६ जुलै ते १७ सप्टेंबर या कालावधीत समर्थ बुथ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक बुथवर कार्यकर्त्यांची फळी तयार करुन, बेसीक बरोबर महिला मोर्चा, युवा मोर्चा यांचीही कमिटी तयार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी दिली. यावेळी भाजपाचे प्रितेश राऊळ, सुहास गवंडळकर, दादा केळुसकर, मनवले फर्नांडीस, सुजाता देसाई, राहूल गावडे, बाळू वस्त, गुरुनाथ घाडी, संकेत धुरी, सचिन गावडे, बाळा जाधव, बाळकृष्ण कुडव, राधाकृश्ण बागकर, सविता देवजी, विराज वस्त, प्रथमेश बागकर, देवेंद्र वस्त, शैलेश बागकर, अक्षय बागकर, रुपेश बागकर, अंकित बागकर, सचिन वस्त, वृंदा वस्त, वासंती खोजुर्वेकर उपस्थित होते.
आसोली शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर यांनी वेंगुर्ला तालुक्यात सर्वप्रथम आपल्या शक्ती केंद्रातील बुथरचना परिपूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सागरतिर्थ बुथमध्ये महीला बुथप्रमुख म्हणून अनुराधा मोटे व युवा मोर्चा बुथप्रमुख म्हणून स्वप्निल बागकर यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
