बांधकाम विभागाच्या अजब गजब कारभाराबाबत तीव्र नाराजी
💫दोडामार्ग दि.२२ सुमित दळवी-:
सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या निष्काळजीपणामुळे दोडामार्ग तालुक्यातील जनतेला खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे.गेल्या तीन वर्षांपासून ही परिस्थिती निर्माण झाली आहे.दोडामार्ग ते बांदा मार्गावर मणेरी पुलाच्या वर बांधलेल्या कठड्याचा काही भाग तुटून पडला आहे त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.पण याची दूरुस्ती न करता बांधकाम विभाग यांनी तुटलेल्या ठिकाणी लाकडाचा वापर केला आहे.बांधकाम विभागाच्या अजब गजब कारभार बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
तिलारी नदीवर मणेरी पुलाच्या ठिकाणी दोन ठिकाणी संरक्षण कठडे तुटले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून तुटलेल्या ठिकाणी दूरुस्ती करावी अशी मागणी करुन देखील दूर्लक्ष केले आहे. त्यामुळे एकादी व्यक्ती किंवा मोटारसायकल चालक नदी पात्रात पडून अपघात होऊ शकतो. पण बांधकाम विभाग यांनी हेतूपुरस्सर दूर्लक्ष केले आहे.
झोपी गेलेल्या बांधकाम विभाग यांनी याची दखल घेऊन मणेरी पुलाच्या तुटलेल्या कठड्याची दूरूस्ती करावी अशी मागणी केली जात आहे.
दोडामार्ग तालुक्यातील रस्ते खराब झाले आहेत तसेच पुलांचे कठडे, काही ठिकाणी मोऱ्या कोसळून पडल्या आहेत.पण याकडे संबंधित अधिकारी यांनी दूर्लक्ष केले आहे.अनेक गटार खुले करु शकले नाही त्यामुळे पाणी रस्त्यावर येत आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग आपल्या कामात पारदर्शकता केव्हा आणणारं असा सवाल उपस्थित केला जात आहे.
