मुसळधार पावसामुळे नांदगावात पूरस्थिती ;अनेक रस्ते झाले बंद

💫कणकवली दि.२२-: आठवड्याभरापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नांदगाव परिसर पाण्याखाली गेले आहेत. बरेच मार्ग बंद झालेले आहेत. यात मुख्यतः नांदगाव ओटव रस्त्यावरुन नदीचे पाणी वाहू लागले असून २ फुटाच्यावर पाणी वाहत असल्याने नागरिकांना चालत जाणेही मुश्कील झाले आहे .नांदगाव ओटव संपर्क पुन्हा एकदा तुटला आहे.

नांदगाव-कुंभारवाडी ,पाठवणेवाडी ,वाघाचीवाडी तसेच मधली वाडी अशा ठिकाणी पाणी आल्याने मुख्य मार्ग बंद झाला आहे तसेच अंतर्गत काही रस्तेही बंद झाले आहेत यात नांदगाव -मधलीवाडी येथील बाबा गगनग्रास यांच्यापर्यंत जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे बंद झाला आहे.तसेच नांदगाव पावाची वाडी येथील नदीचे पाणी ब्रिज वरुन वाहत असल्याने या वाडीचाही संपर्क पुन्हा तुटला आहे. त्याच प्रमाणे मुंबई गोवा महामार्गावरील असलदे तावडेवाडी येथील पियाळी नदीला पूर आला असून पुराचे पाणी अन्यत्र शिरले आहे .सदर नदीचे पाणी पुलाला लागणेसाठी दिड फुटांचे अंतर राहिले होते ‌‌.

You cannot copy content of this page