लोरे शिवगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

वैभववाडी –फोंडा मार्गावरील पुल पाण्याखाली ; वाहतूक ठप्प

💫वैभववाडी दि.२२-: वैभववाडी तालुक्याला बुधवारी व गुरुवारी सकाळपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले. कोसळणाऱ्या पावसामुळे लोरे शिवगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. वैभववाडी – फोंडा मार्गावरील पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

आज सकाळपासून अक्षरशा तालुक्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील सुख व शांति या प्रमुख नद्या आज सकाळपासून दुथडी भरून वाहत आहेत. लोरे येथील शिवगंगा नदीला मोठा पूर आला आहे. वैभववाडी – फोंडा मार्गावर पुराचे पाणी आले आहे. या मार्गावरील पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

You cannot copy content of this page