राजेश मो. पडवळ चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दहावीतील यशाबद्दल सृष्टी हांडे हिचा सत्कार

💫वैभववाडी दि२२-: राजेश मो. पडवळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दत्त मंदिर वैभववाडी येथे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ५०० पैकी ५०० गुण मिळवून वैभववाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात संयुक्त प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल कु.सृष्टी लक्ष्मण हांडे हिचा सत्कार करण्यात आला. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस ट्रस्ट च्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. राजेश मो. पडवळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून वैभववाडी तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात पुढील काळात अनेक उपक्रम राबविले जाणार असल्याचे यावेळी अध्यक्ष राजेश पडवळ यांनी सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी माजी महिला बालकल्याण सभापती व ट्रस्टचे विश्वस्त स्नेहलता चोरगे, वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रिती शिणगारे, कॉन्स्टेबल श्रीमंत अडूळकर मॅडम, ट्रस्टचे अध्यक्ष राजेश पडवळ, वैभववाडीतील जेष्ठ नागरिक बापू कदम, उपाध्यक्ष प्रशांत गुळेकर,सचिव मंदार चोरगे, खजिनदार मंगेश चव्हाण, सल्लागार डॉ.राजेंद्र पाताडे, ट्रस्टचे विश्वस्त व व्यापारी मनोज सावंत, महेश संसारे, समीर नारकर, शरद नारकर, संजय गुरखे, संतोष रावराणे,शेखर रावराणे, सुनिल रावराणे,अक्षय गुरव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page