डासांच्या त्रासापासून बचावासाठी नगरपंचायतीची मोहीम
*💫कणकवली दि.२१-:* कणकवलीतील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे व डासांच्या त्रासापासून त्याचा बचाव व्हावा यासाठी कणकवली नगरपंचायतीने पावले उचलली असून शहरात हरबो स्प्रे डीलक्स लिक्विडची फवारणी करण्यात येत आहे. कणकवली शहरात कोरोनाचा धोका कमी झाला असला तरी कणकवलीत पावसाळ्यात इतर साथीचे रोग व आजार बळावू नये यासाठी कणकवली नगरपंचायत कडून ठोस पावले उचलली जात आहेत याचाच एक भाग म्हणून संपूर्ण शहरात हरबोस्प्रे डीलक्स लिक्विडची फवारणी करण्यात येत आहे. जेणेकरून साचलेल्या पाण्यामधील भागात असलेले डास नष्ट होतील व कुठेही पाणी साचून रोगराई पसरणार नाही व साथीचे रोग बळावू नये याची दक्षता कणकवली नगरपंचायत करून घेण्यात येत आहे.
