मालवण (प्रतिनिधी) लहान मुलांच्या अंगी प्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने तारकर्ली काळेथर ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत क्षेत्रातील तीन अंगणवाड्यातील ० ते ६ वयोगटातील सर्व मुलांना ड्रायफ्रुट प्लस प्रोटीन पावडरचे वाटप करण्यात आले. हे वाटप हे १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आले. याप्रसंगी सरपंच सौ. स्नेहा केरकर, ग्रा.पं. सदस्य सो.ज्योती धुरत, सौ. स्नेहल टिकम, अंगणवाडी सेविका सौ. सुप्रिया केरकर, सौ. विशाखा कुबल, सौ. पुनम गवंडी, दिव्यांका सावंत, योगीता राऊळ, कु. अंकीता मुंबरकर व श्री. ज्ञानेश्वर शिरोडकर यांसह अंगणवाडी मदतनीस तसेच ० ते ६ वयोगटातील मुलांचे आईवडील उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायतीच्या सभागृहात करण्यात आले होते. लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोना विषाणुच्या संक्रमण काळात मुलांच्या अंगी प्रतिकारशक्ती सुधारण्याकरीता आरोग्यविषयक उपक्रम राबविल्या बद्दल ग्रामपंचायत तसेच सरपंच यांचे उपस्थितांनी आभार मानले.
तारकर्ली काळेथर ग्रामपंचायतीच्यावतीने मुलांना ड्रायफ्रुट प्लस प्रोटीन पावडरचे वाटप
