कोकणातील उत्पादनांना बांग्लादेशात बाजारपेठ मिळवून देण्याचे प्रयत्न करणार

बांग्लादेशचे डेप्युटी हाय कमिशनर लुफ्तर रहमान यांचे आश्वासन

*💫मालवण दि.२१-:* महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पुढाकाराने बांग्लादेशाचे डेप्युटी हाय कमिशनर लुफ्तर रहमान यांनी कोकणातील उद्योगांना भेट देऊन माहिती जाणून घेतली. कोकणातील उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी व आयात- निर्यात वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन लुफ्तर रहमान यांनी दिले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चर तर्फे कोकणातील व्यापार उद्योग वाढावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये महाराष्ट्र चेंबरच्या व्यवस्थापन समिती व कार्यकारी समितीची बैठक अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. या बैठकीत कोकणातील व्यापार उद्योगांच्या विकासाच्या दृष्टीने चर्चा झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर कोकणातील व्यापार उद्योगाच्या विकासाच्या दृष्टीने विविध देशांच्या कॉन्सुलेट जनरलची भेट आयोजित करण्यास सुरुवात झाली. प्रथमच बांग्लादेशाचे डेप्युटी हाय कमिशनर लुफ्तर रहमान यांचा १५ जुलै ते १७ जुलै असा तीन दिवसांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. सुरवातीला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरच्या विश्वस्त मंडळाचे चेअरमन श्री.  आशिष पेडणेकर यांनी कोकणातील व्यापार उद्योगांची व स्थानिक बाजारपेठेची माहिती दिली. त्यानंतर  बांग्लादेशाचे डेप्युटी कमिशनर लुफ्तार रहमान यांनी कुडाळ एमआयडीसी येथील कोकणस्फूर्ती अन्नप्रक्रिया प्रकल्प व देवगड अल्फानसो मल्टिफ्रुट असोसिएशन, बजाज राईस मिलला भेट दिली. या प्रकल्पात जिल्ह्यतील फणस आंबा, जांभूळ आवळा अशा विविध फळांपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांची व प्रक्रिया करण्याच्या पद्धतीची माहिती जाणून घेतली.  तसेच चिवारच्या कॉनबॅक बांबू क्लस्टरला भेट दिली बांग्लादेशाचे डेप्युटी कमिशनर लुफ्तर रहमान यांनी कोकणातील व्यापार उद्योगाची माहिती जाणून समाधान व्यक्त केले. कोकणातील उत्पादनांना बांग्लादेशात बाजारपेठ मिळवून देण्यासाठी व आयात आणि निर्यात वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले. याप्रसंगी कॉन्सुल असिफ अहमद, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरचे माजी उपाध्यक्ष श्री. करुणाकर शेट्टी, सरकार्यवाह श्री. सागर नागरे सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी चेअरमन सुभाष मयेकर महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य श्री. विजय केनवडेकर, श्री. चंद्रशेखर पुनाळेकर, श्री. मनोज राणे, श्री. गणेश भांबे, कॉनबॅकचे श्री.  ठाकूर, सौ रेणुका, श्री. श्रीधर ओगले, श्री. नकुल पार्सेकर, श्री. यतीन मयेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page