कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोस्टमन सुहास जाधव यांचा सन्मान

*💫कणकवली दि.२१-:* सिंधुदुर्गनगरी मुख्य पोस्ट ऑफिस येथे पोस्टमन पदावर कार्यरत असलेले सुहास राजाराम जाधव यांना सिंधुदुर्ग डाक विभाग, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत सन २०२०-२०२१ या कोरोना महामारीच्या काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उत्कृष्टता प्रमाणपत्र पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सिंधुदुर्ग डाक विभाग अधीक्षक ए.बी. कोड्डा यांच्या हस्ते गौरविण्यात आले. श्री जाधव यांनी आपल्या सेवेचा प्रारंभ 1987 ला देवगड येथील ग्रामीण भागात ग्रामीण डाक सेवक म्हणून केला, त्यानंतर त्यांनी पोस्टमन पदाची खात्यांतर्गत परीक्षा पास होऊन १एप्रिल १९९५ ला मुख्य पोस्ट ऑफीस देवगड येथे पोस्टमन म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी कुडाळ येथील पोस्ट ऑफिसमध्ये काही वर्ष काम केले, त्यानंतर पासून ते आजपर्यंत ते सिंधुदुर्गनगरी मुख्य पोस्ट ऑफीस येथे पोस्टमन म्हणून कार्यरत आहेत. गेली २६ वर्षे ते चालत व सायकलने प्रवास करून पत्रांचे तसेच मनीऑर्डर चे वितरण करत आहेत. या पुरस्कारानंतर बोलताना श्री जाधव म्हणाले की कौतुकाची थाप पाठीवर पडली की काम करायला अजून प्रेरणा मिळते. अतिशय प्रामाणिकपणे काम करणार्‍या श्री जाधव यांना या अगोदर महाराष्ट्राचे माजी राज्यपाल श्री. सी विद्यासागर राव यांच्या हस्ते 9/10/2014 रोजी ‘ *टपाल दिन* ‘ या दिवशी उत्कृष्ट पोस्टमन म्हणून पुरस्कार देऊन गौरव केला होता.

You cannot copy content of this page