आपली प्रकरणे सामोपचाराने सोडवा:न्या.सलीम जमादार
*💫कणकवली दि.२०-:* कणकवली दिवाणी न्यायालय व तालुका असोशिएशन कणकवली यांच्यावतीने १ ऑगस्ट २०२१ रोजी दिवाणी न्यायालय कणकवली येथे सकाळी १०.३० वाजता ‘ राष्ट्रीय लोक अदालत’ चे आयोजन करणेत आलेले आहे . हे लोकअदालत पक्षकारांच्या हितासाठी असून त्यातून त्यांना कमीत कमी खर्चात प्रभावी न्याय मिळू शकतो . ज्या पक्षकारांची प्रलबित असलेली दिवाणी व फौजदारी , ग्रामपंचायत पतसंस्था , बँका याना आपली जास्तीत जास्त वादप्रकरणे तडजोडीसाठी मिटवावीत यासाठी पक्षकारांनी उपस्थित राहून खटले मिटवावेत तसेच कोणत्याही पक्षकार व वकील यांना न्यायालयात प्रलंबित प्रकरणात लोकअदालती पुर्वी आपल्या प्रकरणांची पुर्वबोलणी करणे आवश्यक वाटत असल्यास संपर्काचे आवाहन केले आहे . सदर लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवून आपली प्रकरणे सामोपचाराने सोडविण्याचे आवाहन दिवाणी न्यायाधीश कणकवली सलीम अ.जमादार यांनी केले आहे .
