आर्थिक मदत करा

दशावतारी कलाकारांची जिल्हा प्रशासनाजवळ मागणी

*💫ओरोस दि.२०-:* कोरोना लॉकडाऊनमुळे सिंधूदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक दशावतार नाट्यप्रयोग थांबले आहे. यामुळे जिल्ह्यातील असंख्य कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने या कलाकारावर आलेली बेरोजगारी दूर करून उदरनिर्वाहसाठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सिंधूदुर्ग जिल्हा पारंपरिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाने लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे. यावेळी बाळू कोचरेकर, चारुहास मांजरेकर, महेश गवंडे, रवी खानोलकर, संतोष गावडे, सुभाष लोंडे, राजन बांदेकर, सुधीर तांडेल, गोटया येरागी, लक्ष्मण नांदोसकर, चारुदत्त तेँडालकर, कृष्णा घाट, दादा केळूसकर, नितिन घाडीगांवकर, मनोहर वालावलकर आदी पारंपरिक दशावतारी कलाकार उपस्थित होते. जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांना देण्यात आलेल्या निवेदनात, २०२०-२१ या कालावधीत शासनाने कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊन जाहिर केले. सिंधूदुर्ग जिल्ह्यात पारंपरिक दशावतार मंडळामधून अनेक कलाकार कार्यरत आहेत. लोककला जोपासणे, त्यामाध्यमातून प्रबोधन करणे, तसेच स्वतःचे अर्थाजन करीत उदरनिर्वाह करीत असल्याने या कलेवर अवलंबून असतात. दशावतारी कलाकार हा मुळात कोणत्याही मंडळाचा नोंदणीकृत सदस्य नसतो. तो प्रत्येक वर्षी मंडळ बदलत असतो. त्यामुळे या कलाकारां जवळ वैयक्तिक असा कलाकार म्हणून कोणताही कायदेशीर पुरावा नसतो. वर्षातील सहा ते सात महीने कला जोपासत असताना सतत होणार जागरण यामुळे त्यांना अनेक आजार होतात. परिणामी याचा विचार केल्यास मिळणाऱ्या तूटपुंज्या मोबदल्यातून लॉकडाऊन सारख्या समस्यांचा सामना करणे या कलाकारांना डोईजड झाले आहे. याच कलेवर अवलंबून असलेल्या कलाकारांना लॉकडाऊन काळात नाट्यप्रयोग बंद झाल्याने आर्थिक संकटाशी सामना करावा लागत आहे. उदरनिर्वाह कसा करावा ? या विवंचनेतून सर्व कलाकार मोठ्या चिंतेत आहेत. त्यामुळे या निवेदनाद्वारे शासन स्तरावरुन सर्व लोक कलाकारांवर आलेली बेरोजगारी करून उदरनिर्वाहसाठी आर्थिक मदत मिळावी. योग्य ते सहकार्य करून असंख्य कलाकारांचे जीवन सूखकर करावे, अशी मागणी केली आहे.

You cannot copy content of this page