शिरोडा येथील सलून व्यावसायिकाने दाखविले सामाजिक भान

वाढदिवसानिमित्ताने केले मास्क वाटप

*💫वेंगुर्ले दि.२०-:* कोरोणा विषाणूच्या महामारी मध्ये ग्रामस्थांच्या सुरक्षतेसाठी शिरोडा येथील सलून व्यावसायिकाने वाढदिवसाच्या निमित्त मास्क वाटप केले. गेल्या वर्षापासून कोरोना विषाणू चे संपूर्ण जगावर सावट असून कोरोना पासून बचाव करण्यासाठी विविध उपाय योजना आखल्या जातात याला अनुसरून शिरोडा येथील सलुन व्यवसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेश अनंत रेडकर वय वर्ष ६५ यांनी वाढदिवस निमित्त ग्रामस्थांची सुरक्षा म्हणून त्यांना चांगल्या दर्जाचे मास्क वाटप केले. सुरेश रेडकर हे दरवर्षी आपल्या वाढदिवसाला इतर खर्च न करता ते समाज उपयोगी कार्य करीत आहेत त्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page