बांदा आर.टी.ओ चेकपोस्ट येथील ‘ते’ खड्डे देतात अपघाताला निमंत्रण;गाड्यांचे नुकसान

“वी फाॅर यू” संस्थेने प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांचे वेधले लक्ष

*💫सावंतवाडी दि.१९-:* बांदा आर.टी.ओ चेकपोस्ट येथे सुमारे ६ फूट रुंद व २ फूट खोलीचे २ धोकादायक खड्डे चुकीच्या नियोजन व कामामुळे निर्माण झाले आहेत. रात्रीच्या काळोखात सदरचे खड्डे हे अजूनच धोकादायक बनत आहेत. १७ जुलै रोजी रात्री सुमारे ७ ते ८ गाड्या त्या खड्याच्या भक्षस्थळी पडून गाड्यांचे नुकसान झाले आहे. तसेच सदरच्या खड्यामुळे त्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. तरी कोणताही मोठा अपघात होण्यापूर्वी यात लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे “वी फाॅर यू” संस्थेने प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे केली आहे. यावेळी “वी फाॅर यू” संस्थेचे अध्यक्ष ॲड. संकेत नेवगी, सचिव ॲड.स्वप्निल कोलगांवकर, सहसचिव अमेय महाजन, खजिनदार मिहीर मोंडकर, सदस्या ॲड.सायली चव्हाण, सुमित मळीक आदी उपस्थित होते. यावेळी संबंधित समस्येचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणात लक्ष घालून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहे. तसेच संबंधित प्रकार नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या निदर्शनास आणून देणार,असेही ते म्हणाले.

You cannot copy content of this page