तिसरीतील वेदिका लुडबेला 100 पैकी 99 गुण प्राप्त
*💫मालवण दि.१८-:* जून 2021 मध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरीय ब्रेन डेव्हलपमेंट स्पर्धा परीक्षेत अंबाजी विद्यालय वायरी मालवण शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे.या परीक्षेसाठी इयत्ता तिसरीतील वेदिका परशुराम लुडबे हिने 100पैकी 99 गुण प्राप्त केले. तसेच इयत्ता चौथीतील वेद प्रवीण कुबल याने 100 पैकी 99गुण मिळवून, दोघेही सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले आहेत.त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.गणपत चौकेकर सर, सौ मयुरी खोत मॅडम, यांचे मार्गदर्शन लाभले.
