नागरीक संतप्त;रहिवाश्यांनी वाहने पार्किंगमधून काढली बाहेर
*💫कणकवली दि.१८-:* मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार यांच्या गलथान कारभाराचा कणवलीकरांना भोगावा लागला आहे. कणकवली शहरात यावर्षी सलग दुसऱ्यांदा रामेश्वर प्लाझा इमारतीच्या पार्कींग व तळमजल्यावर पाणी भरले. गेले तीन-चार दिवस कोसळणार्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात लगतच्या नाल्यांमध्ये पाणी आले होते. मात्र गोकुळधाम हॉटेलच्या बाजूला पाणी विसर्ग होत असलेल्या तोंडावर महामार्ग ठेकेदारांने काम व्यवस्थित न केल्याने त्याचा फटका रामेश्वर प्लाझातील रहिवाशांना बसत आहे. चालू वर्षी सुरुवातीला एकदा पाणी तुंबले.त्याकडे महामार्ग प्राधिकरण अधिकारी व ठेकेदाराने दुर्लक्ष केला आहे.त्यामुळे पुन्हा पाणी थेट रामेश्वर प्लाझा इमारतीमध्ये घुसल्याने वाहने पाण्यात अडकली होती.सायंकाळी ५ वाजल्यापासून रहिवाश्यांनी जीव मुठीत धरुन आपली वाहने पार्किंग मधून बाहेर काढली. कणकवली महामार्ग उड्डाणपुलाचे काम आटोपल्यानंतर कणकवली शहरातील गटारे व नाले विसर्ग चांगल्या पद्धतीने करण्याची गरज होती. मात्र ठेकेदार कंपनीने काम संपल्याने पोबारा केला आहे. त्याचा फटका या ठिकाणी पहिल्याच पावसात या भागातील नागरिकांना बसला आहे. त्याचबरोबर अन्यही कणकवली शहरातील नाले गटारे अर्धवट टाकून पळ काढला आहे. अनेकदा सत्ताधारी व विरोधकांनी आवाज उठवून देखील त्याकडे दुर्लक्ष करत हा कंपनीचा ठेकेदार प्रसार झाला आहे. पाणी भरले त्यावेळेस रामेश्वरला प्लाझा रहिवासी डॉ.अशोक कदम,गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,वकील पी.एन.कुलकर्णी,शिवाजी कासले, सुनील कदम, अमित दळवी आदीनी आपली वाहने बाहेर काढली आहेत.
