अशोक सावंत,धोंडी चिंदरकर यांच्यासहित पदाधिकाऱ्यांनीही थेट दिल्ली गाठत ना.राणे यांचे केले अभिनंदन

*💫मालवण दि.१८-:* भाजपचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री ना. नारायण राणे यांची केंद्रीय लघु व सुक्ष्म उद्योग मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ना. नारायण राणे यांच्या भेटीची आतुरता लागलेल्या जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी खास दिल्ली दौरे काढून ना. राणे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अशोक सावंत आणि भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्यासहित मालवण भाजपा पदाधिकाऱ्यांनीही थेट दिल्ली गाठत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे अभिनंदन केले आहे . महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व भाजप नेते नारायण राणे यांची केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग खात्याच्या कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाल्यानंतर सिंधुदुर्गात भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. केंद्रीय मंत्री म्हणून ना. नारायण राणे यांचे जिल्ह्यात स्वागत करण्यास भाजप पदाधिकारी व समर्थक आतुर आहेत. मात्र संसदेचे होणारे अधिवेशन आणि नवीनच मंत्री झाल्याने सर्व नवीन मंत्र्यांना ऑगस्टपर्यंत दिल्लीतच राहण्याच्या सूचना दिल्याने ना. नारायण राणेंचा दिल्ली मुक्काम वाढला. त्यामुळे ना. राणे यांच्या अभिनंदनासाठी जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी खास दिल्ली दौरे काढले आहेत. मालवण भाजपा पदाधिकाऱ्यांनीही शुक्रवारी दिल्ली गाठून ना. नारायण राणे यांचे अभिनंदन करत त्यांच्याशी चर्चा केली. ना. राणेंच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट घेतली. यावेळी जिल्हापरिषदचे माजी अध्यक्ष अशोक सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर, विजय केनवडेकर, पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, नगरसेवक गणेश कुशे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page