जिल्हा बँकेच्या बांदा शाखेने शंभर कोटींचा व्यवसाय टप्पा गाठला

बांदा भाजपच्यावतीने शाखा व्यवस्थापक व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार

*💫बांदा दि.१८-:* आपल्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या बांदा शाखेने १०० कोटींचा व्यवसाय टप्पा गाठल्याने बांदा भाजपच्यावतीने जिल्हा बँकेच्या शाखा व्यवस्थापक प्राची नाईक व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अक्रम खान म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची व सर्वसामान्यांची म्हणून ओळखली जाते. या बँकेने नेहमीच शेतकऱ्यांना आधार दिला आहे. व्यवस्थापक सौ. नाईक यांच्या येण्यापूर्वी शाखेचा एकत्रित व्यवसाय हा ३५ कोटी रुपये होता. त्यांनी आपल्या कौशल्याने हा टप्पा १०२ कोटी रुपयांवर नेऊन ठेवला आहे. त्यांच्या ग्राहकाभिमुख सेवेमुळे आज अनेकजण बँकेशी जोडले गेले आहेत. यावेळी जिल्हा परिषद सदस्या उन्नती धुरी, श्वेता कोरगावकर, सभापती निकिता सावंत यांच्या हस्ते सौ. नाईक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्या अंकिता देसाई यांच्यासह जिल्हा बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page