*💫सावंतवाडी दि.१८ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ३२ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात २८ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात जुना बाझार १, सबनीस वाडा १, वैश्यवाडा १, सावंतवाडी १ तर ग्रामीण भागात कारिवडे ७, कोलगाव भोंम ४, कोलगाव निरुखे १, कोलगाव ३, निरवडे १, आरोंदा १, मडूरा १, इन्सुली १, माजगाव ४, तळवडे २, माडखोल २, चोकुळ १ असे रुग्ण सापडले असून, सद्य स्थितीत तालुक्यात २५९ सक्रिय रुग्ण आहेत.
