*💫बांदा दि.१८-:* सावंतवाडी तालुक्यातील साई होली फेथ इंग्लिश मिडियम स्कूलच्या अथर्व राजन मुळीक या विद्यार्थ्याने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर गुणवत्तापूर्वक अभ्यास करत दहावीच्या शालान्त परिक्षत 93 टक्के गुण मिळवत घवघवीत यश प्राप्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला. परंतु शिक्षणाची आवड असल्याने कोणतीही तमा न बाळगता अथर्वने आई-वडिलांच्या अपेक्षेप्रमाणे गुण मिळविले. दहावीच्या परिक्षेत 90 टक्केच्यावर गुण मिळतील असा विश्वास होता अशी प्रतिक्रिया अथर्वचे वडिल तथा जि.प.सदस्य राजन उर्फ राजू मुळीक यांनी दिली. तर आई-वडिल व शिक्षकांच्या मुख्य मार्गदर्शनामुळेच आपण 93 टक्के गुण मिळवू शकलो, असल्याचे अथर्वने सांगितले. त्याच्या यशाबद्दल सावंतवाडी तालुक्यासह जिल्ह्यातूनही अभिनंदन होत आहे.
अथर्व मुळीकचे घवघवीत यश
