चतुर्थीला येणाऱ्या चाकरमान्यांना दहा दिवस क्वारंटाईन ठेवा

मंगेश तळवणेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

*💫सावंतवाडी दि.१७-:* गणेश चतुर्थीचा सण आता जवळ येत असल्याने चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावात येणार आहेत. त्यांच्यासाठी मुंबईतच विशेष बाब म्हणून लसीकरण करुन, गावात आल्यानंतर किमान १० दिवस शाळेत किंवा सार्वजनिक इमारतीत क्वॉरंटाईन करुन त्यांना घरी प्रवेश द्यावा. अशी मागणी श्री देव विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना अध्यक्ष मंगेश लक्ष्मण तळवणेकर यांनी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे याबाबत त्यानी प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात त्यांनी अस म्हटल आहे की हल्लीच सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्यमंत्री, पालकमंत्री, तसेच मा. जिल्हाधिकारी, मा. जिल्हा चिकित्सक व आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नाने रेड झोन मधून बाहेर पडत आहे. गेली दीड वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोनाने हाहाकार माजविला आहे. ब-याच ठिकाणी आरोग्य कर्मचारी रुग्णसंख्येअभावी कमी पडत होते. तरीही त्यांनी जीवाची बाजी लावत रुग्णांना बरे केले. लग्न समारंभ, जत्रा, उत्सव, बाजारात लोकांनी कोरोना गेल्याप्रमाणे तुफान गर्दी केल्याचा परिणाम आजही भोगावा लागत आहे. गणेश चतुर्थी हा मोठा उत्सव असल्याने चाकरमान्यांनी गावात येऊन सुद्धा नियमांचे पालन करावे . जेणेकरुन आता रेडझोन मधून बाहेर पडलेला जिल्हा पुन्हा रेड झोनमध्ये जाणार नाही व संकटाला सामोरे जाण्याची वेळ येणारी नाही. तसेच शासनाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुरेसे ऑक्सीजन व व्हॅटीलेटर बेडची व्यवस्था करावी. व्हॅटीलेटर कमी असल्याने बरेचसे रुग्ण दगावले आहेत. तसेच कोरोना काळात जेथे रुग्णाचे नातेवाईक, जवळची माणसे घाबरुन रुग्णाच्या आजूबाजूला सुद्धा जात नव्हती अशा वेळी आमच्या शासकीय व कंत्राटी आरोग्य सेविका, डॉक्टर, आरोग्य सेवक, सफाई कर्मचारी व इतर वैद्यकीय स्टॉफ यांनी वेळप्रसंगी त्यांना राहण्यासाठी भाडयाची रुम, घरे मिळत नसताना, हॉस्पीटलमध्ये राहून सुद्धा सेवा बजावली आहे. गावात गेल्यानंतर लोक त्यांना बघून नको नको ते टोमणे मारत होते. काही जणांची घरे सुद्धा वाळीत टाकली. अशा वेळेस कंत्राटी कर्मचा-यांनी तुटपुंज्या पगारात अहोरात्र सेवा दिली. त्यातील जास्तीत जास्त कंत्राटी कर्मचा-यांना गणेश चतुर्थीची भेट म्हणून आरोग्य विभागात येणा-या भरतीत विशेष बाब म्हणून कायम स्वरुपी सामावून घ्यावे व उर्वरीत कंत्राटी कर्मचारी यांचेसाठी राखीव कोटा पुढील सर्व भरतीत ठेवण्यात यावी अशी मागणी सुद्धा तळवणेकर यांनी यावेळी केली आहे.

You cannot copy content of this page