*💫कणकवली दि.१७-:* कणकवली तालुक्यातील शेर्पे माध्यमिक विद्यालय शेर्पे या हायस्कुलच्या इयत्ता १० वीच्या सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील विद्यर्थ्यांचा अंतिम निकाल हा १००% लागला असून शाळेचा विद्यार्थी रोहीत प्रकाश कुडाळकर याने८०.८०% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने इयत्ता १० वी चा रिझल्ट शुक्रवारी जाहीर केला यामध्ये शेर्पे हायस्कुल मध्ये प्रथम — रोहित प्रकाश कुडाळकर (गुण- ८०.८०%),द्वितीय — कु.फातिमासुग्रा बशीर थोडगे (गुण- ७७.६०%),तृतीय — कु.मानसी महेश शेलार (गुण- ७६.६०%) अनुक्रमे प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तर हायस्कुल मधून परीक्षेला एकूण १८ विद्यार्थी बसले होते. यापैकी ३ विद्यार्थी विशेष प्राविण्य ,९ विद्यार्थी प्रथम श्रेणी तर ६ विद्यार्थी द्वितीय श्रेणी मिळवून उत्तीर्ण झालेत. शेर्पे हायस्कुल चे मुख्याध्यापक श्री अत्तार सर यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आभार मानले आहेत.
शेर्पे माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा १०० टक्के निकाल ;रोहित कुडाळकर प्रथम
