बांधकामासाठीचे त्रिशंकु दगड नवाबाग किनारी भागात टाकल्याने मच्छिमारीस अडथळा

रापण संघातर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दगड हटविण्याची केली मागणी

*💫वेंगुर्ले दि.१७-:* मच्छिमारांच्या मागणीनुसार मांडवी खाडी मुखाच्या ठिकाणी आधुनिक बंधारा ( ब्रेक वाॅटर ) बांधकामासाठी तयार करण्यात आलेले सिमेंट काँक्रीटचे त्रिशंकु आकाराचे दगड हे नवाबाग किनारी भागात अस्ताव्यस्त टाकले गेल्याने पारंपारिक रापण मच्छिमारी व बिगर यांत्रिकी मच्छिमारीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे . त्यामुळे सदरचे त्रिशंकु दगड तातडीने हटविण्याची मागणी रापण संघाच्यावतीने भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे . पारंपारिक मच्छिमारांच्या मागणी नुसार भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी उभादांडा – नवाबाग किनारी भेट दिली व मच्छिमारांच्या समस्या जाणून घेतल्या . यावेळी मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , रापण संघाचे सुबोध खडपकर , रामचंद्र आरावंदेकर , मनोहर टाककर , मच्छिमार संस्थेचे संचालक अशोक खराडे , विक्रांत सारंग , जितेंद्र टाककर , योगेश मोर्जे , विश्वनाथ खराडे इत्यादी मच्छिमार बांधव उपस्थित होते . त्यानंतर जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मच्छिमार बांधवांसोबत तहसीलदार प्रवीण कुमार लोकरे यांची भेट घेऊन मच्छिमारांना अडथळा आणनारे दगड ठेकेदाराकडुन ताबडतोब काढून घ्यावेत अशी मागणी केली . यावेळी सहा.मच्छी.अधिकारी जोशी उपस्थित होते . तसेच ह्या प्रश्नी जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मच्छिमारांचा सांगितले .

You cannot copy content of this page