कासार्डे येथे उद्या शोकसभेचे आयोजन

*💫कणकवली दि.१७-:* सुप्रसिध्द गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांच्या अकाली निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला. कासार्डे येथील सिंधुभूमी कला अकादमी व मा. आमदार प्रमोद जठार मित्र परिवाराच्यावतीने रविवारी सकाळी 10 वा. शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. कासार्डे येथील अभिषेक मंगल कार्यालयात ही सभा होणार आहे.  सिंधुदुर्गचे सुपुत्र, जेष्ठ गझलकार, पत्रकार, कवी, अखिल भारतीय गझल संमेलनाचे अध्यक्ष, महाराष्ट्र टाईम्सचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे रविवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखंद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोकसभेला कै. मधुसूदन नानिवडेकर प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन संजय विठ्ठल नकाशे यांनी केले आहे. 

You cannot copy content of this page