कासार्डे माध्यमिक विद्यालयाचा निकाल १००टक्के

*💫कणकवली दि.१७-:* कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा शालांत परीक्षेचा निकाल १००टक्के लागला असून कु.श्रावणी चंद्रकांत नर हिने ८७.४०टक्के गुणांसह विद्यालयात अव्वल स्थान पटकावले आहे. कु.अर्ची अजित मोर्ये हीने ८६.४०टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि कु. शामल गणेश भुसेकर ही ८१.४० गुणांसह तृतीय आली आहे. कासार्डे माध्यमिक विद्यालयातून सन २०२०-२१या शालांत परीक्षेत एकूण १२२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते .त्या पैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत विद्यालयाचा निकाल १००%लागला आहे. या परीक्षेत विद्यालयातील १४ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले तर प्रथम श्रेणीत ६३ व द्वितीय श्रेणीत ४२ तर ३ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर, मानद सरचिटणीस उपेंद्र पाताडे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर व स्कुल कमिटी चेअरमन तथा प्राचार्य मधुकर खाड्ये पर्यवेक्षक नारायण कुचेकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page