राणे कुटुंबावर मनापासून प्रेम करणारा माणूस आम्ही गमावला

आम. नितेश राणे यांनी मधुसूदन नानिवडेकर यांना वाहिली श्रद्धांजली

*💫वैभववाडी दि.१३-:* आदरणीय मधुसूदन नानिवडेकर आणि माझं नातं हे साहित्य क्षेत्रापलीकडील होतं. आणि ते नातं सांभाळताना मला खूप समाधान वाटत असे. प्रत्येकाच्या दुःखात, अडचणीत त्या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहणं ही आम्हा कार्यकर्त्यांना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची शिकवण आहे. स्वर्गीय नानिवडेकर यांच्या कुटुंबाला उभं करणं ही आपली जबाबदारी आहे. राणे कुटुंबावर मनापासून प्रेम करणारा माणूस आम्ही गमावला. श्रीमंत मनाचा माणूस आपण गमावला आहे. अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी मधुसूदन नानिवडेकर यांना श्रद्धांजली वाहिली. आठ दिवसापूर्वी त्यांचा मला फोन आला होता. त्यांचा आवाज बरोबर येत नव्हता. मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. आपल्याला काय मदत हवी आहे का. अशी देखील विचारणा केली. पण नियतीने डाव साधला. आणि नानिवडेकरांना आपलेसे केले. अशा दुःखद भावना राणे यांनी व्यक्त केल्या. महाराणा प्रताप शिक्षण संस्था संचलित वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात कवी, गझलकार, ज्येष्ठ साहित्यिक मधुसूदन नानिवडेकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, सज्जनकाका रावराणे, नायब तहसीलदार अशोक नाईक, प्रमोद रावराणे, गुलाबराव चव्हाण, प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, शारदा कांबळे, सुधीर नकाशे, सीमा नानिवडेकर, हर्षदा हरयाण, प्राची तावडे, शुभांगी पवार, बापी मांजरेकर, बाळा हरयाण, बाबा कोकाटे, परब सर, संतोष टक्के, श्री निंबाळकर व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अरविंद रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, प्राध्यापक एस एन पाटील, एस.पी. परब, सीमा नानिवडेकर, बंडूकाका मुंडले, प्राचार्य काकडे, पत्रकार किशोर जैतापकर, शारदा कांबळे, प्रमोद रावराणे यांनी मनोगतातून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष टक्के यांनी केले.

You cannot copy content of this page