आम. दीपक केसरकर नव्हे तर जनताच मतपेटीतून त्यांना संपवेल

रुपेश राऊळ;राजन तेलींनी दिल्ली दरबारी नारायण राणेंच्या केबिन बाहेर बसावे

*सावंतवाडी :* आ. दीपक केसरकर यांची इच्छा आजवर सावंतवाडीकर जनतेने पुर्ण केली आहे. येथील जनता ही दीपक केसरकर यांच्यावर प्रेम करते, त्यांचा आदर करते. त्यामुळे त्यांची इच्छा सावंतवाडीकर पुर्ण करतील. त्यामुळे संपवायच काम आ. केसरकर नाही तर त्यांचावर प्रेम करणारी जनताच मतपेटीतून करेल. असा पलटवार शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी राजन तेली यांच्यावर केला आहे. कोण भ्रष्टाचार करू शकत हे इथल्या जनतेला ठावूक आहे. त्यामुळे कोणाला संपवायचं हे जाणण्या इतकी येथील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे नागरिक मतदान पेटीतूनच त्यांना संपवतील. दरम्यान, कोव्हीडमुळे नागरिक त्रस्त असताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ऑक्सिजन बेडच कोव्हीड सेंटर उभारण्याची वल्गना करणाऱ्या राजन तेलींच कोव्हीड सेंटर राहिलं कुठे ? जमत नसेल तर आम्हाला सांगा अशी भाषा करणाऱ्या राजन तेलींनी साधं कोव्हीड सेंटर उभारायला जमलं नाही. कोव्हीड सेंटरचा नावाखाली जागा पहाणीची ड्रामाबाजी करणाऱ्या राजन तेलींनी सावंतवाडीचा जनतेची फसवणूक केली. त्यामुळे आ. दीपक केसरकर यांच्यावर बोलण्यापेक्षा आता राजन तेलींनी दिल्ली दरबारी नारायण राणेंच्या केबिन बाहेर बसावं असा जोरदार टोला शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी लगावला आहे.

You cannot copy content of this page