बावशी महीला बचत गटाच्या महिलांनी घेतली आम. नितेश राणेंची भेट
*💫कणकवली दि.१२-:* कणकवली तालुक्यातील बावशी जयमल्हार स्वयं. सहायता महिला बचत गटाच्या महिलांनी आम. नितेश राणेंची भेट घेऊन चर्चा केली.यावेळी रेशनिंग दुकानाच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून आॕगस्ट महीन्यापर्यंत रेशनिंग दुकानाचा परवाना दिला जाईल, असे आश्वासन आम. नितेश राणे यांनी दिले आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी व नायब तहसीलदार यांनाही तशा सुचना बैठकीत करण्यात आल्या आहेत.
कणकवली तालुक्यातील बावशी जयमल्हार स्वयं. सहायता महिला बचत गट यांमार्फत बावशी गावाच्या स्वतंत्र रेशनिंग दुकानासाठी गेल्यावर्षी पुरवठा विभागाकडे प्रस्ताव सुपूर्द करण्यात आला होता. मात्र कालांतराने पुरवठा विभागाने प्रस्ताव रद्द केल्याने महिला बचत गटामार्फत महिलांनी पुरवठा विभागाच्या विरोधात आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. दुस-या दिवशी नायब तहसीलदार सुजाता पाटील यांच्या लेखी आश्वासनामुळे उपोषण मागे घेण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर बचत गटाच्या महिलांनी आज आमदार नितेश राणेंची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी भाऊसाहेब गिते, कणकवली नायब तहसीलदार सुजाता पाटील, कणकवली पुरवठा अधिकारी ममता तांबे तसेच कणकवली सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, भाजपचे शक्तीकेंद्र प्रमुख भाई मोरजकर, योगेश सदडेकर, तोंडवली बावशी उपसरपंच अशोक बोभाटे, ग्रा. पं. सदस्य रविंद्र बोभाटे, गौरवी बोभाटे, समिर मोरये तसेच महिला बचत गटाच्या प्रमुख उपस्थित होत्या.
