भाजपाचे जिल्हा प्रबंधकाना धडक देत निवेदन
*💫सावंतवाडी दि.१२-:* साटेली-सातार्डा येथील बीएसएनएल सुविधा वर्षभरापासुन खंडित आणि सध्या पुर्णपणेच ठप्प असल्याने भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी बीएसएनएलला धडक देत जिल्हा प्रबंधक बीएसएनएल देशमुख यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, कोरोना काळात आॅनलाईन शिक्षण, लसीकरण माहिती कींवा रजिस्ट्रेशन, आॅफिसियल काम कींवा शेतकरी वर्गास निदान काॅल करणे कींवा इतर कामांसाठी टाॅवर नेटवर्कची गरज आहे. सीमाभागात या सगळ्या विषयात गोवा टाॅवरवर अवलंबुन रहाण योग्य नाही. त्यामुळे ही सेवाआठ ते दहा दिवसात पुर्ण करा अन्यथा १५ आॅगस्टला टाॅवरवर चढुन उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी भाजप उपाध्यक्ष ज्ञानदिप राऊळ, भाजप युवा मोर्चा जिल्हा सचिव संजय नाईक, सातार्डा शक्तीप्रमुख रवि धुपकर, गोविंद प्रभु. कीरण प्रभु उपस्थित होते.
