कणकवलीत रेल्वे स्टेशनवर मुंबईहून दाखल झालेल्या प्रवाशाचा मृत्यू

कणकवली 9 जुलै (प्रतिनिधी)-मुंबईवरून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसमधून आलेल्या आज दुपारच्या सुमारास कणकवली रेल्वे स्टेशन येथे दाखल झालेल्या तुकाराम कृष्णा भोगले या तरेळे -वाघाचीवाडी येथील प्रवाशाची कणकवली प्लॅटफॉर्मवर उतरताच तब्येत खालावली व फ्लॅट फॉर्मवर पडले असता त्याना रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.या प्रकाराने रेल्वे पोलीस आणि आरोग्य विभागाची धांदल उडाली. तुकाराम कृष्णा भोगले यांच्या नेमके मृत्यूचे कारण समजले नसले तरी त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत तपास सुरू होता.

You cannot copy content of this page