*💫कणकवली दि.०७-:* खारेपाटण या गावी कोरोना बाधित रुग्णांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या खारेपाटण-रामेश्वरनगर येथील कोविड केअर सेंटर करिता नडगिवे येथील गांगेश्वर सेवा मंडळ नडगिवे (गावठणवाडी ) यांच्यावतीने नुकतीच वस्तूरूप देणगीसह रोख १०,००० रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. नडगीवे गांगेश्वर सेवा मंडळ गावठणवाडीचे माजी चिटणीस कै.सुभाष तायाराम मण्यार यांच्या स्मरणार्थ खारेपाटण कोविड केअर सेंटरला आपण ही आर्थिक मदत देत असल्याचे या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष भास्कर राणे यांनी सांगितले. तर खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांची नडगीवे गांगेश्वर सेवा मंडळ पदाधिकारी यांनी भेट घेऊन त्यांच्याकडे ही रोख रक्कम व वस्तूरूप देणगी साहित्य सुपूर्द केले. यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे,सौ.रश्मी रमाकांत राऊत,पत्रकार संतोष पाटणकर, ग्रामविकास अधिकारी जी.सी वेंगुर्लेकर, खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम पारकर,नडगीवे गांगेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष भास्कर राणे,कार्यकर्ते – गुरुनाथ मण्यार,गणेश मण्यार,भाई सुर्वे,आत्माराम मण्यार, कमलाकर मण्यार,आशिष मण्यार,विशाल सावंत, ऋषिकेश मण्यार, योगेश चव्हाण,श्रेयस मण्यार,अनिकेत मण्यार आदि पदाधिकारी उपस्थित होते.तसेच खारेपाटण कोविड सेंटरच्या स्टाफ नर्स श्रीम.इच्छा राणे,औषध निर्माता – मधुकर खोत उपस्थित होते. खारेपाटण कोविड केअर सेंटर ला आज देण्यात आलेल्या मदतीत गांगेश्वर सेवा मंडळ नडगीवे – १०,००० रुपये,नुपूर सुभाष मण्यार – ५०००/- ,निलेश श्रीकांत पाटील – २०००/- ,किशोर आत्माराम मण्यार – १०००/- असे मिळून सुमारे १८,००० रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.तसेच १५ लिटर सॅनिटायझर,मास्क बॉक्स,हॅन्डग्लोज बॉक्स,स्प्रे बॉटल आदी वास्तु देण्यात आल्या.खारेपाटण ग्रामस्थांनी नडगिवे गांगेश्वर सेवा मा मंडळाचे आभार मानले.
नडगिवे गांगेश्वर सेवा मंडळ गावठणवाडीतर्फे खारेपाटण कोविड सेंटरला वस्तूरूप देणगी
