फुटबॉलचा उत्कृष्ट गोलकीपर ते यशस्वी विकेटकीपर, संघनायक;जगातील सर्वात महान विकेटकीपर धोनीचा आज वाढदिन
*💫सिंधुदुर्ग दि.०७ प्रसन्न गोंदावळे-:* भारतीय संघाचा माजी कर्णधार मॅच फिनिशर महेंद्रसिंग धोनी याचा आज वाढदिवस. ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनेलच्या वतीने त्याच्या जीवनावर टाकलेला प्रकाशझोत.महेंद्रसिंग धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ ला बिहार मधील रांची (आता झारखंड मध्ये समाविष्ट झाले आहे) येथे झाला. झारखंडच्या रांची मध्ये श्यामाली येथे डीएव्ही जवाहर विद्यामंदिर मधुन धोनीने आपले शालेय शिक्षण पुर्ण केले. तो एक अॅथलेटिक विद्यार्थी होता, सुरूवातीच्या काळात क्रिकेट पेक्षा बॅडमिंटन आणि फुटबाॅल या खेळांमधे त्याला अधिक रूची होती. आपल्या शाळेतील फुटबाॅल टिमचा तो चांगला गोलकिपर म्हणुन ओळखला जात होता या दरम्यान धोनी च्या फुटबाॅल कोच ने त्याला स्थानीक क्लबच्या क्रिकेट टीमचा विकेटकिपर म्हणुन पाठविले. त्यावेळी धोनी ने आपल्या चांगल्या प्रदर्शनाने सगळयांनाच आकर्षीत केले आणि १९९५ ते १९९८ दरम्यान कमांडो क्रिकेट क्लब टीम मधे नियमित विकेटकिपर म्हणुन स्थान मिळविले. तेथूनच पुढे धोनी क्रिकेटकडे वळला. महेंद्रसिंग धोनीला आज एक चांगला क्रिकेटर म्हणुन सर्वदुर ओळख आहे. एम. एस. धोनी व माही या नावाने तो क्रिकेट जगतात सुपरीचीत आहे. क्रिकेट जगतात त्याने आपल्या भारताचे नाव सर्वदुर चमकविले आहे. लहान गावातुन निघुन एक महान क्रिकेटपटु होण्यापर्यंत धोनीला अनेक संघर्षामधुन जावे लागले. . जगापुढे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुरूवातीच्या काळात महेंद्र सिंग धोनी करता हा प्रवास एवढा सहज सोपा मुळीच नव्हता पण क्रिकेट विषयी त्याला प्रचंड प्रेम आणि कठोर मेहनत घेण्याची तयारी या त्याच्या जमेच्या बाजु ठरल्याने आज त्याने हे यश मिळविले आहे. शाळेत असतानाच धोनीने क्रिकेट खेळायला सुरूवात केली होती, परंतु भारतिय क्रिकेट संघाचा हिस्सा होण्यासाठी त्याला अनेक वर्ष लागली. ज्यावेळी त्याला भारताकडुन खेळण्याची संधी मिळाली त्यावेळी त्याने या संधीचे अक्षरशः सोने केले व हळुहळु स्वतःला सिध्द केले. एवढेच नाही तर आज जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेट विरांमधे ’’माही’’ चे नाव घेतले जाते, त्याने मर्यादित षट्कातही भारतीय संघाचे उत्तम नेर्तृत्व केले. सप्टेंबर २००७ पासुन जानेवारी २०१७ पर्यंत महेन्द्रसिंग धोनी भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार पदावर होता व २००८ ते २०१४ पर्यंत कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार होता. साहसी, रोमांचक व्यक्तिमत्व व युनिक हेयरस्टाईल ठेवणारा धोनी भारताचा एक लोकप्रीय क्रिकेटर व मार्केटिंग आयकाॅन देखील ठरला आहे. माहीला आपल्या प्रतिभेचा थोडा सुध्दा गर्व नाही म्हणुन देखील तो भारताचा आवडता क्रिकेट खेळाडु आहे. धोनी त्या कर्णधारांपैकी एक आहे ज्यांनी ज्युनियर आणि भारतीय ए क्रिकेट संघाच्या क्रमवारीत राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. माही एक ’’आदर्श’’ आणि पिन अप स्टार देखील आहे. माहीने भारताच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संघाला २०११ साली दुसरा विश्वकप मिळवुन देण्यात आपले महत्वपुर्ण योगदान दिले आहे. या विजयामुळे त्याचे फार कौतुक झाले आणि भारतीय संघातील सर्वात चांगला खेळाडु ठरला. धोनीने २३ डिसेंबर २००४ ला बांग्लादेश विरूध्द भारताकडुन पहिला एकदिवसीय सामना खेळला. आपल्या खेळातील आक्रमक शैलीमुळे त्याने विशेष ओळख तयार केली. माही भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली २००९ साली भारतीय संघ क्रमांक एक चा संघ बनला. २००७ साली आयसीसी विश्वचषक २०/२० आणि २०१३ आयसीसी चॅंपियंस ट्राॅफी जिंकतांनाच्या दरम्यान देखील महेंद्रसिंग धोनीने भारतिय क्रिकेट संघाचे नेर्तृत्व केले होते. आयपीएल सामन्यांमधे देखील माहीने अनेक आंतरराष्ट्रीय रेकाॅर्डवर आपले नाव कोरले आहे. आपल्या आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्स् च्या मदतीने २०१० आणि २०११ मधे दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. अशा या भारताच्या माजी कर्णधारास ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनेलकडून वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा……
