लुपिन फाउंडेशनच्या वतीने ग्रामपंचायतींना थर्मल गन व साहित्य प्रदान

मांगवली, कोकिसरे व नाधवडे ग्रामपंचायतीचा सामावेश

वैभववाडी प्रतिनिधी लुपीन फांऊंडेशन मार्फत तालुक्यातील नाधवडे, मांगवली व कोकिसरे या तीन ग्रामपंचायतींना थर्मल गन, आँक्सीमीटर व पीपीई किट वाटप करण्यात आले. कोरोना काळात लुपीन फांऊंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात आले. गरजूंना अन्नधान्य वाटप, मास्क वाटप, शिक्षण संस्थांना वैद्यकीय साहित्य वाटप करण्यात आले होते. लुपीन फांऊंडेशन मार्फत तालुक्यातील ग्रामपंचायतींना वैद्यकीय साहित्य वाटप करण्यात आले. तालुक्यातील नाधवडे, कोकीसरे, मांगवली या ग्रामपंचायतींना हे साहित्य संस्थेमार्फत पुरविण्यात आले. यामध्ये थर्मल गन,आँक्सीमीटर व पीपीई किट यांचा समावेश आहे. या तिन ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या हे साहित्य स्वाधीन करण्यात आले. यावेळी कोकीसरे सरपंच दत्ताराम सावंत, नाधवडे उपसरपंच सुर्यकांत कांबळे, मांगवली उपसरपंच शिवाजी नाटेकर, ग्रा.प.सदस्य महेश संसारे, प्रफुल्ल कोकाटे, लुपीन फांऊंडेशनचे प्रविण पेडणेकर, चंद्रकांत म्हापणकर उपस्थित होते. फोटो – मांगवली येथे साहित्य वाटप करताना लुपीन चे पदाधिकारी.

You cannot copy content of this page