काँग्रेस व राष्ट्रवादी च्या दणक्यानंतर शहरातील वीजपुरवठा सुरळीत

महेंद्र सांगेलकर व पुंडलिक दळवी यांनी विचारला वीज अधिकाऱ्यांना जाब

*💫सावंतवाडी-:* येथील उद्यान जवळील विज खांबाला एका कंटेनर ने धडक दिल्याने शहरातील काही भागातील बत्ती गुल झाली होती. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील देखील लाईट गेल्याने कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेल कर यांनी आक्रमक पवित्रा घेत विज वितरण कार्यालयाला धडक दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी देखील उपस्थित होते. महेंद्र सांगेलकर यांनी आक्रमक होत विज वितरणाच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला नंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने विज पुरवठा सुरळीत केला आहे.

You cannot copy content of this page