आंबोली घाटाच्या दुरुस्तीसंदर्भात अनिल चव्हाण यांनी सुरू केलेले उपोषण अखेर मागे

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांची यशस्वी शिष्टाई

*💫सावंतवाडी दि.०६-:* सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाने आंबोली घाटातील कामांवर कोरोनाचे कारण पुढे करत अधिकाऱ्यांनी केलेला दुर्लक्ष या कामचुकार अधिकाऱ्यांविरोधात आंबोली येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी सावंतवाडी येथील बांधकाम विभाग समोर उपोषण सुरू केले होते. यावेळी सायंकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला आहे. यावेळी सबंधित अधिकाऱ्याला मेमो देण्यात येणार असून, येत्या २ महिन्यात काम पूर्ण न केल्यास त्या ठेकेदाराची बदली करण्यात येईल आणि पगारवाढ रद्द करण्यात येईल असे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता माने यांनी दिले असून, उपअभियंता आवटी यांनी हे निवेदन उपोषणकर्ते अनिल चव्हाण यांना सुपूर्द केले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे उपोषण सोडविण्यात यश मिळवले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डि‌. के. सावंत, जिल्हा उपाध्यक्ष शफिक खान, उद्योग व्यापार कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, उद्योग व व्यापार महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर-देसाई, सावली पाटकर, युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजू धारपवार, पदवीधर मतदारसंघ तालुकाध्यक्ष प्रसाद दळवी, बावतीस फर्नांडिस, आसिफ ख्वाजा, इफ्तिकार राजगुरू, प्रतिक नाईक अँड. बापू गव्हाणकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page