इंधन दरवाढीमुळे काँग्रेसचे केंद्रसरकार विरोधात महाआंदोलन

तालुका पातळीवर काढणार सायकल यात्रा; जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांची माहिती

*💫सावंतवाडी दि.०५-:* देशात इंधन आणि महागाई वाढत असल्याने कॉंग्रेसने केंद्र सरकारच्या विरोधात महा आंदोलन पुकारले असून, याबाबतची माहिती जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी दिली आहे. यावेळी हे महा आंदोलन शुक्रवार दिनांक ९ जुलै पासून सुरु करण्यात येणार असून, महिलांकडून जिल्हा मुख्यालय येथे आंदोलन करण्यात येणार आहे. तर १० जुलै रोजी कुडाळ शहरात सकाळी १०:३० वाजता सायकल रॅली काढण्यात येणार आहे. तर रविवारी ११ ते १५ जुलै पर्यंत पेट्रोल पंपावर सह्याची मोहीम राबवण्यात येणार आहे. तर १२ व १३ जुलै रोजी तालुका पातळीवर सायकल यात्रा काढण्यात येणार आहे. तसेच १२ ते १५ जुलै रोजी महिला कॉंग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळा गावडे, जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख, महिला अध्यक्ष साक्षी वंजारी, सेवादल अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष जगन्नाथ डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, सरचिटणीस प्रकाश जैतापकर, चंद्रशेखर जोशी, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष विधाता सावंत, कणकवली तालुका अध्यक्ष प्रदिप मांजरेकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, देवगड तालुका अध्यक्ष उल्हास मणचेकर, नगरसेवक प्रकाश डिचोलकर, अमिदी मेस्त्री, उत्तम चव्हाण, देवानंद लुडबे, बाळू अंधारी, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे, जेम्स फर्नांडिस, लक्ष्मीकांत परूळेकर, पल्लवी तारी, जस्मीन लक्क्षमेश्वर, किरण टेंबूलकर, चंदन पांगे, महेश तेली, समीर वंजारी, महेश परब, खलिल बगदादी, केतनकुमार गावडे, देवगडकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page