कोंकण रेल्वे विद्युतीकरण तारेच्या चोरीमागे कंपनीतील एका कामगाराचाच हात

चोरी केलेला माल परस्पर विकल्याचा संशय;चौकशी करण्याची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत पाताडे यांची मागणी

*💫कुडाळ दि.०५-:* कोकण रेल्वेचे विद्युतीकरण करणाऱ्या ठेकदार कंपनीतील एका कामगारांनी विद्युतीकरणासाठी आलेली तार व इतर सामान चोरी करून परस्पर विकले आहे. असा आरोप जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत पाताडे यांनी केला असून, सबंधित व्यक्ती आणि कंपनीची पूर्ण चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुडाळ पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्याचबरोबर तेथील सिक्युरिटी एजन्सी ची देखील चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी विद्युतीकरण करणारी कंपनी आणि सिक्युरिटी एजन्सी कंपनी यांनी संगनमताने ही चोरी केली असल्याचा आरोप केला आहे. यावर योग्य ती चौकशी करून कारवाई न केल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्या कंपनीविरोधात आंदोलन करतील असा इशारा प्रशांत पाताडे यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page