सावंतवाडीत सार्वजनिक बांधकाम विभागात होते कार्यरत
*आंबोली दि.०३-:* सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागात सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेले सुहास जोशी (वय ५४), यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई, भाऊ असा परिवार आहे. गेली अनेक वर्ष ते बांधकाम विभागात कार्यरत होते. आंबोली घाटाबाबत बरीचशी माहिती त्यांना होती. त्यामुळे बांधकाम अधिकारी त्यांच्या भरवशावर राहत असत.
