सावंतवाडी लायन्स क्लब कडून डॉक्टर डे साजरा

*💫सावंतवाडी दि ०१-:* लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या माध्यमातून आज सावंतवाडी येथे राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस, सनदी लेखापाल (सी. ए) दिवस आणि कृषी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला आहे. यावेळी सावंतवाडी येथील ज्येष्ठ डॉक्टर खानोलकर, डॉ. अंकिता तावडे, सी. ए चिन्मय रानडे आदी मान्यवर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला आहे. तसेच कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण देखील करण्यात आले. यावेळी लायन्स चे अध्यक्ष अँड परिमल नाईक, झेड सि. ला.अशोक देसाई, उपाध्यक्ष विद्याधर तावडे, सचिव अमेय पई, खजिनदार प्रसाद राऊत, बाळ बॉर्डेकर, संतोष चौडणकर, गजानन नाईक, नरेंद्र देशपांडे, महेश भाट, डॉ. गोविंद जाधव आदी लायन्स क्लबचे सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page