Headlines

75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने दोन हजार रुपयांचे अनुदान दरमहा द्यावे

आनंद अंधारी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

*💫कणकवली दि.०१-:* 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने कमीत कमी दोन हजार रुपयांचे अनुदान दरमहा द्यावे, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार तथा सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे विश्वस्त आनंद अंधारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. आजच्या कोरोना महामारीच्या काळात वाढती महागाई व औषधे यावर होणारा खर्च ज्येष्ठ नागरिकांना परवडत नाही. यासाठी अती वयोवृद्ध म्हणजे 75 वर्षावरील ज्येष्ठांना शासनाकडून मानधन मिळण्याची गरज आहे. यामुळे अशा ज्येष्ठांचे जगणे सुसह्य होईल. तसेच कुटुंबालाही त्यांचे ओझे वाटणार नाही. असे आनंद अंधारी यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page