आंबोली येथे ‘गार्डन हल्दी विथ सेल्फी’ शुभारंभ

सरपंच गजानन पालेकर यांच्या वाढदिनाचे निमित्त

*💫आंबोली दि.३०-:* सरपंच श्री.गजानन पालेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आंबोली ग्रामपंचायत येथे सुशोभित उद्यान “गार्डन_हल्दी विथ सेल्फी” चा शुभारंभ सरपंच पालेकर यांच्या हस्ते आज करण्यात आला.ग्रामपंचायत समोर आज सेलम हळद लागवड कार्यक्रम आज करण्यात आला. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या जातीची भात लावणी कृषी सहाय्यक श्रीमती एस.पी.पाटील यांच्या साहाय्याने प्रात्यक्षिक डेमो करण्यात आला. यावेळी पारिजातक,बाभूळ,आवळा,उंबर, अमलतास,पी.बांबू,सोनचाफा,नागकेशर,सिल्व्हर ओक, आंबा, सप्तपर्णी,बदाम, सिता ओक,कदंब या सुशोभित झाडांची लागवड करण्यात आली.तसेच फुलझाडे ही लावण्यात येणार आहेत.याठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने आंबोली ग्रामपंचायतीला नवा लूक देण्यात येणार आहे.याठिकाणी गार्डन सेल्फी पॉइंट बनवण्यात येणार आहे.यावेळी उपसरपंच दत्तू नार्वेकर,सदस्य महेश पावसकर, छाया नार्वेकर,काशिराम राऊत,निधी गुरव,सारिका गावडे,सावित्री पालेकर,शंकर चव्हाण,ग्रामविकास अधिकारी रतीलाल बहीराम,कृषी सहाय्यक सौ.पाटील,लिपिक आबा नार्वेकर,ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते

You cannot copy content of this page