चिंदर येथे १ रोजी कृषी मेळावा

*💫मालवण दि.२९-:* महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त साजऱ्या होणाऱ्या कृषी दिनाचे औचित्य साधून मालवण पंचायत समितीच्या वतीने चिंदर ग्रामपंचायत येथे दि. १ जुलै रोजी सकाळी कृषी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 

यावेळी सकाळी १०. ३० वाजता वृक्षारोपण, प्रमाणपत्र वितरण व मार्गदर्शन होणार आहे. तर चिंदर येथील दत्त मंदिर समोर दु. १२ वा. बचत गटांना बियाणे वाटप व लागवड प्रात्यक्षिक होणार आहे. तर दुपारी २.३० वा. किल्ले भगवंतगड येथे वृक्षारोपण मोहीम व मुलांनी जमा केलेल्या वृक्ष बियांचा सीड बॉल फेकण्याचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page