वेत्येमध्ये सँनिटायझर व मास्क वाटप

बाळूगावडे व सुनील गावडे मित्र मंडळाचा उपक्रम

सावंतवाडी वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता वेत्ये गावात बाळू गावडे व सुनिल गावडे मित्रमंडळाच्या वतीने घरोघरी मास्क सॅनिटायजर व साबणाचे वाटप करण्यात आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात करोनाचे प्रमाण वाढतेच आहे, कोरोनाच्या दुसर्या लाटेत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, घराघरात कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासनही हतबल झाले, मात्र कोरोनाला हरविण्यासाठी आजही प्रशासनन जोरदार प्रयत्नशील आहे. त्यासाठी मास्क स्निटायझर तसेच सामाजिक अंतर राखण्याचे वारंवार आवाहन प्रशासनन करत आहे. आज डेल्टाप्लस रुग्णही जिल्ह्यात मिळाला आहे, त्यामुळे प्रशासनन अधिकच सतर्क झाले आहे, एकुणच कोरोनाचे वेगवेगळे प्रकार आढळून येत असल्याने आपल्या गावातील नागरिकांची काळजी घेण्यासाठी वेत्ये येथील सामाजिक कार्यकर्ते महेश उर्फ बाळू गावडे आणि माजी सरपंच सुनिल गावडे मित्रमंडळ पुढे सरसावले आहे, गावातील सुमारे अडीचशे कुटुंबाला त्यांनी मास्क सॅनिटायजर व साबणाचे वाटप केले. शिवाय आपल्या कुटुंबाची काळजी कशी घ्यायची याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ महीमा गावडे, सौ मनाली गावकर, नंदिनी निगुडकर, गोविंद गावडे,तेजस गावडे,सागर गावडे, राजन आंबेरकर, आप्पा गावकर,विजय निगुडकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page