रेडा कार्यालयाच्या बाहेर बांधून उपोषण

दूसरा रेडा वाहून गेल्याने नुकसानी मिळण्याची मागणी;भरपाई मिळाल्याशिवाय आंदोलन संपणार नाही:-रमेश नाईक

*दोडामार्ग / सुमित दळवी* ऐन शेतीच्या हंगामात रेडा नदीपात्रात वाहून जाऊन मृत झाला होता,संबंधित विभागाने तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी होत होती,परंतु अधिकारी वर्ग थातुरमातुर उत्तरं देत असल्याने आज आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी वर्गाने घेतला आहे मृत रेड्याची भरपाई देण्यासाठी संबंधित विभाग टाळाटाळ करत असल्यामुळे आज चक्क संबंधित नुकसान झालेल्या शेतकऱ्याने आपला दुसरा रेडा तिलारी कार्यालयाच्या बाहेर बांधून उपोषण सुरू केले आहे. दरम्यान जोपर्यंत आपल्याला नुकसानभरपाई मिळत नाही, तोपर्यंत आपण उठणार नाही, असा इशारा रमेश नाईक यांनी दिला आहे. त्यांच्या या उपोषणाला शेतकरी वर्गाने सुद्धा पाठिंबा दिला आहे.

You cannot copy content of this page