बंदी असतानाही मांगेली धबधब्यावर पर्यटक

पोलिसांचा कडक बंदोबस्त; पर्यटकाना पाठविले माघारी

*💫दोडामार्ग दि.२८-:* मांगेली फणसवाडी येथील धबधबा ठिकाणी पर्यटकांस येण्यास बंदी असताना देखील पर्यटक वेगवेगळ्या मार्गाने येत आहेत , यांना रोखण्यासाठी पोलिसांचा चोख कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता .खोक्रल येथील शांतादुर्गा , सिध्देेश्वर मंदिराच्या बाजूला पोलिस तैनात होते .येथूनच आलेल्या पर्यटकांना माघारी पाठविण्यात येत होते . वर्षा पर्यटना साठी प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून मांगेली धबधबा ल्या गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांची पसंती आहे .येथे हजारों पर्यटक पर्यटनाची मज्जा लुटण्यासाठी येतात पण गत दोन वर्षात कोरोना मुळे पर्यटकांस या ठिकाणी येण्यास बंदी घातली आहे .या वर्षी ही कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ग्रा .पं.सनियंत्रण समितीने धबधबा जवळ येऊ नये असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे .तसेच तालुक्यात अनेक ठिकाणी बॅनर लावून पर्यटन स्थळ ठिकाणी येण्यास बंदी असल्याचे जाहिर केले आहे .तरी देखील आडमार्गाने काही पर्यटक धबधबा पर्यत पोहचत आहेत .यामुळे कोरोना चा धोका वाढण्याची शक्यता आहे .ही बाब गावचे सरपंच विश्वनाथ गवस यांनी पोलिस निरीक्षक यांच्या निदर्शनास आणून देत लेखी निवेदन दिले होते .या नुसार रविवारी खोक्रल मंदीर आणि धबधबा परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला होता .असे असताना देखील काही पर्यटक आले होते .त्यांना तंबी देत माघारी पाठविण्यात आले.खोक्रल येथील मंदीर जवळ सरपंच देवेंद्र शेटकर , पोलिस पाटील विलास शेटकर , तर मांगेली धबधबा परीसरात सरपंच गवस पोलिसां समवेत उपस्थित राहून सहकार्य करीत होते .

You cannot copy content of this page