*💫कणकवली दि.२४-:* पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वटवृक्षाचे असलेले महत्व लक्षात घेऊन निसर्ग मित्र परिवार या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या मार्फत तळेरे येथे मुंबई गोवा महामार्गालगत वटवृक्षाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सदस्य व सल्लागार : दादासाहेब महाडिक सदस्य : प्रवीण वरुणकर, राजकुमार वायंगणकर, निलेश तळेकर, स्वप्नील पाटील, अध्यक्ष : संजय खानविलकर, सचिव : राजेश जाधव यांचेसह छोटा निसर्गमित्र : रोहन खानविलकर हे उपस्थित होते. निसर्ग मित्रपरिवाराच्या या उपक्रमाकरीता ओम वाडये यांनी आपल्या नर्सरीतून विनामूल्य रोपे उपलब्ध करून दिली.
निसर्ग मित्र परिवारातर्फे वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षारोपण
