कोरोनातील आजारात एक लाखापर्यंतचा खर्च मिळणार! अभिनव उपक्रम राबविणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद ! जि प अध्यक्षा सौ संजना सावंत
*💫ओरोस दि.२३-:* कोरोना महामारीत गावपातळीवर राबणार्या सरपंचांना विमा कवच असावे ही मागणी राज्य सरकार पूर्ण करू शकले नाही. मात्र सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व सरपंचांना आपल्या स्वनिधीतून विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मंगळवारी सुरू झाली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे व आमदार नीतेश राणे यानीही सरपंचांसाठी विमा कवच असावे अशी भूमिका घेतली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात सरपंचासाठी अभिनव उपक्रम राबविणारी हि जि.प. राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे. जि.प. अध्यक्षा सौ संजना सावंत यांनी आपल्या कार्याची छाप अध्यक्ष पदाचा कार्यभार घेतल्यापासून दाखवीली आहे. कोरोनाचा काळ असतानाही विवीध उपक्रम आणि विविध प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी सौ सावंत यांनी कामाचा धडाका सुरु ठेवला आहे. दरम्यान जीपचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर आणि जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये चांगले काम करता आले आहे. सरपंचांना विमा कवच देण्याच्या निर्णयातही प्रशासनाने जि.प. पदाधिकाऱ्यांच्या या निर्णयात एकमुखी साथ दिल्यामुळे जिल्ह्यातील ४२८ सरपंचांना एक लाखाचे विमा संरक्षण कोरोनाच्या साथीत मिळणार आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या टीमवर्कमुळे जिल्ह्यातील नागरिकांसाठी व सरपंच व अन्य लोकप्रतिनिधींसाठी ही जिल्हा परिषद विविध प्रश्नांवर चांगले काम करेल असेही जि.प. अध्यक्षा संजना सावंत यांनी सांगितले. जिल्ह्यातील पंधरा प्रातिनिधिक सरपंचांना निमंत्रित करून त्यांना ही विमा पॉलिसी बहाल करण्यात आली. या वेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील सभापती अंकुश जाधव, शर्वाणी गावकर, डॉ अनिशा दळवी, सावी लोके आदी पदाधिकारी या वितरण सोहळ्यात उपस्थित होते.
