सरपंच स्नेहा केरकर यांचे तहसील कार्यालयसमोर उपोषण सुरु

नियम तोडणाऱ्या कोरोना रुग्णा विरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप

*💫मालवण दि.२१-:* तारकर्ली गावात गाव कृती समितीच्या मार्फत कोरोना कंटेन्मेंट झोनमध्ये आदेशांची अंमलबजावणी करत असताना आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यां कोरोना रुग्णा विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याबाबत पोलीस कर्मचारी व प्रशासनातील शासकीय कर्मचारी जबाबदारी झटकून एकमेकांवर चालढकलपणा करीत असल्याचा आरोप करत तारकर्ली गाव कृती समितीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देणाऱ्या सरपंच सौ. स्नेहा केरकर यांनी आज मालवण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. गावात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई कोणी करावी याबाबत तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्यात तू तू- मै मै सुरू असून नेमकी कारवाई कोणी करावी याची लेखी माहिती आपणास द्यावी व त्यानुसार प्रशासनाने कारवाई करावी, तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही असे यावेळी स्नेहा केरकर यांनी स्पष्ट केले. कोरोना विषाणुचे संक्रमण रोखण्यासाठी कडक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे मात्र त्यादृष्टीने तारकर्ली गावात उपाय योजना होत नाहीत ते होण्यासाठी तारकर्ली सरपंच सौ स्नेहा केरकर या उपोषणाला बसल्या आहेत आज दुपारी प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार श्री. कोकरे यांनी सौ. केरकर यांची उपोषणस्थळी भेट घेतली. याबाबत गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, तरी उपोषण स्थगित करण्यात यावे, अशा आशयाचे पत्र यावेळी तहसीलदारांच्या वतीने श्री. कोकरे यांनी केरकर यांना दिले. दरम्यान, उपोषणा दरम्यान पंचायत समितीचे सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, दीपक सुर्वे यांनी सौ. केरकर यांची भेट घेत चर्चा केली. याविषयी त्यांनी तहसीलदार अजय पाटणे यांच्याशीही चर्चा केल्यानंतर कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई बाबत गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांना पत्र देऊन कारवाई कोणी करायची हे निश्चित करण्याबाबत प्रयत्न करू असे भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष श्री. चिंदरकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page