कळसुलकर स्कूल, आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालयात योगदीन साजरा

मुलांमध्ये उत्साह

*💫सावंतवाड़ी दि.२१-:* एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय एनसीसी, राष्ट्रीय छात्र सेना विभागामार्फत आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिकांद्वारे योग दिन साजरा केला. आपापल्या घरी योग प्रकार केलेले विविध छायाचित्रे व्हाट्सअप ग्रुप वर एकमेकांना पाठविल्याने मुलांमध्ये उत्साह वाढला. तसेच योगाचे महत्त्व व बदलत्या जीवनशैलीचे तोटे अधोरेखित झाले. एनसीसी विभागाचे 58 एनसीसी बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल नरेश कुमार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सदर उपक्रमास कर्नल सी एस के लेखराज यांनी शुभेच्छा दिल्या . प्रशालेचे मुख्याद्यापक एन पी मानकर, एन सी सी विभाग प्रमुख फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस, यांनी कॅडेटस ना प्रोस्ताहित केले .

You cannot copy content of this page