मडुरा-सातोसे रस्त्यावरील मोरी पुलाला भगदाड

अपघाताची शक्यता : तात्काळ बुजविण्याची मागणी

*💫बांदा दि.२१-:* मडुरा पंचक्रोशीत गेल्या चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली. मडुरा-सातोसे मार्गावरील परबवाडी येथे मोरी पुलाला भलेमोठे चार ते पाच फुटी भगदाड पडले. रात्रंदिवस या मार्गे वाहतूक सुरू असल्याने रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील धोका व हानी टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर धोकादायक भगदाड तात्काळ बुजविण्याची मागणी वाहनचालक तसेच मडुरा, सातोसे ग्रामस्थांमधून होत आहे. मडुरा-सातोसे मार्गावरील परबवाडी जवळ असलेल्या मोरी पुलाजवळ करण्यात आलेले पाईपलाईनचे काम धोकादायक ठरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी चार ते पाच फुटी खोल भगदाड पडले आहे.तर सातोसेच्या दिशेने जाताना उजव्या बाजूने पूर्णपणे भगदाडाच्या बाजूचा भाग दबला असून अवजड वाहने यावरून गेल्यास हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन सदर भगदाड बुजवून मार्ग निर्धोक करण्याची मागणी मडुरा, सातोसे ग्रामस्थांनी केली आहे.

You cannot copy content of this page